बंद

    कृषी विभाग

    अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

    सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी सन 2024-2025 करिता नविन सुधारित अनुदानानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागार्मात राबविण्यात येत आहे. क्षेत्रियस्तरावर सदर योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदांचा कृषि विभाग करीत आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

    या योजनेंतर्गत नविन विहीर (रु. 4.00 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.1.00 लाख), 10 अक्ष्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरिता प्रचलित आर्थीक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या पंप संच (डिझेल / विद्युत पंप) (90% किंवा रु. 40 हजार ), विज जोडणी आकार (रु. 20 हजार), इनवेन बोअरींग (रु. 40 हजार), सोलर पंप (विज जोडणी आकार किंवा पंप संचा ऐवजी) (रु. 50 हजार), शेततळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण (रु. 2.00 लाख), यंत्रसामग्री (बैलचलित / ट्रॅक्टर चलित) अवजारे (रु. 50 हजार), तुषार सिंचन (15 % किंवा रु. 47 हजार मर्यादेत) व ठिबक सिंचन (15 % किंवा रु. 97 हजार मर्यादेत) या सर्व बांबींबर अनुदान अनुज्ञेय आहे.

    योजनेचा लाभ घेणेसाठी पात्रतेचे निकष:-

    1. लाभार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.
    2. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
    3. शेतकऱ्याचे त्याच्या स्वत:चे नावे 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे.
    4. शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेच्या 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.
    5. द्रारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांस प्रथम प्राधान्य राहील.
    6. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे स्वत:चे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

    7. एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यांस किंवा कुटूंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही.तसेच नविन विहीरीचा लाभ घेतल्यास लाभार्थ्यास 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ अनुज्ञेय राहील.

    8. सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या 7/12 उताऱ्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.

    बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

    या योजनेंतर्गत नविन विहीर (रु. 4.00 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.1.00 लाख), 10 अक्ष्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरिता प्रचलित आर्थीक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या पंप संच (डिझेल / विद्युत पंप) (90% किंवा रु. 40 हजार ), विज जोडणी आकार (रु. 20 हजार), इनवेन बोअरींग (रु. 40 हजार), सोलर पंप (विज जोडणी आकार किंवा पंप संचा ऐवजी) (रु. 50 हजार), शेततळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण (रु. 2.00 लाख), यंत्रसामग्री (बैलचलित / ट्रॅक्टर चलित) अवजारे (रु. 50 हजार), परसबाग (रु. 5 हजार), तुषार सिंचन (15 % किंवा रु. 47 हजार मर्यादेत) व ठिबक सिंचन (15 % किंवा रु. 97 हजार मर्यादेत), विंधन विहीर (फक्त वनक्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांनाच) (रु. 50 हजार) या सर्व बांबींबर अनुदान अनुज्ञेय आहे.

    योजनेचा लाभ घेणेसाठी पात्रतेचे निकष:-

    1. लाभार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.
    2. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
    3. शेतकऱ्याचे त्याच्या स्वत:चे नावे 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे.
    4. शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेच्या 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.
    5. द्रारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांस प्रथम प्राधान्य राहील.
    6. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे स्वत:चे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
    7. एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यांस किंवा कुटूंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही.तसेच नविन विहीरीचा लाभ घेतल्यास लाभार्थ्यास 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ अनुज्ञेय राहील.
    8. सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या 7/12 उताऱ्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.
    9. विंधन विहीर या घटकाचा लाभ फक्त वनक्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांनाच घेता येईल.

    सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्यांचा ऑनलाईन महा-डीबीटी खालील वेबसाईड वर अर्ज करावा. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थ्‌ळावर दाखल करावा.

    राष्‍ट्रीय बायोगॅस विकास योजना

    बायोगॅसचे फायदे :-

    स्वयंपाकाकरीता गॅस, विद्युत निर्मीती स्लरीपासुन शेतीकरीता उत्तम खत याप्रमाणे शेतकऱ्यांच्या उन्नती करीता बायोगॅस एक उत्तम प्रकल्प.

    निकष:-

    1. लाभार्थ्याकडे कमीत कमी 5 जनावरे असावीत.
    2. स्वताचे मालकीची जागा (12 X 12) फुट असावी.

    अनुदान मर्यादा:-

    1. घ.मी. क्षमतेचे बायोगॅस सयंत्र उभारणी प्रति सयंत्रास अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती रु. 17000/- सर्वसाधारण इतर रु. 9800/-
    2. 2 ते 4 घ.मी. क्षमतेचे बायोगॅस सयंत्र उभारणी प्रति सयंत्रास अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती रु. 22000/- व सर्वसाधारण इतर 14350/-
    3. शौचालयास जोडलेल्या बॉयोगॅस सयंत्रास अतिरिक्त केंद्रीय सहाय्य प्रति सयंत्र रु.1600/-

    उद्दिष्टे:-

    आधुनिक कृषितंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदु मानुन आवश्यक त्या सर्व संसाधनाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे व अर्थसहाय्य करणे. तसेच जिल्हात गुणवत्ता पुर्ण कृषि निविष्ठा पुरवठा सुरळीत ठेवणे च्या अनुषंगाने उपाययोजना करणे.

    कार्य:-

    1. राज्य पुरस्कृत योजनाची अंमलबजावणी करुन जिल्हातील शेतकऱ्यांना सिंचन विहीरीकरीता अर्थ सहाय्य देवून त्यांनी आर्थिक परिस्थिती सुदृढ करणे.

    2. गुणवत्ता पुर्ण कृषि निविष्ठा जिल्हातील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरीता नियोजन करणे व गुणनियंत्रक निरिक्षकामार्फत गुणवत्तेबाबत मोहीम राबवुन गुणवत्तेची कृषि निविष्ठा उपलब्ध करुन देणे.

    3. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा व निविष्ठा विषयक माहिती मिळण्याकरीता कृषि मेळावा व सभा घेवून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे.