बंद

    ग्रामीण पाणी व पुरवठा विभाग

    जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे मुख्यालय असून वर्धा जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये या विभागाचे उपविभाग़ कार्यरत आहेत. तसेच जिल्हा परिषदेंतर्गत या विभाग़ाचा यांत्रिकी उपविभाग कार्यरत आहे.

    वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 765 स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असून जिल्हा परिषद मार्फत एकूण 9 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 4883 हातपंप व 51 विद्युतपंप कार्यरत आहेत.

    जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला घरगुती नळ जोडणींद्वारे शुध्द व स्वच्छ असे गुणवत्तापूर्ण पेयजलाचा नियमितपणे पाणी पुरवठा करुन त्यांचे आरोग्य सुस्थितीत राखणे व त्यांचे जीवनमान उंचावणे, पर्यायाने देशाच्या विकासात योगदान देणे हे या विभागाचे ध्येय आहे.

    उद्दिष्टे:-

    भारत देशामध्ये बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पेयजलाचा पुरवठा करण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग़ाची स्थापना करण्यात आलेली आहे.

    कार्य:-

    1. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विविध पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करणे.
    2. जिल्ह्यातील ग्रामपंचायती व इतर संस्थांना पाणी पुरवठा विषयक बाबींकरिता तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य करणे.
    3. रस्ते, रेल्वे, व केंद्र तथा राज्य शासनाच्या इतर यंत्रणांशी आवश्यक सहकार्य व सहभागाने त्यांच्या योजना पूर्ण करण्यास मदत करणे.
    4. पाणी पुरवठ्याच्या उपांगांचे मूल्यमापन तसेच त्यांचे विविध संकेतस्थळे व पोर्टल्सवर नोंदी ठेवणे.
    5. शासनाच्या भूजल संवर्धन व स्रोत बळकटीकरणांचे उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे.