राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील सर्वांगीण विकास यामध्ये प्रामुख्याने खेडे स्वंयपुर्ण बनणे याकरीता खेड्याकडे चला या बाबींवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा भर होता. ग्रामीण भागाचा विकास होण्याच्या दृष्टीने पंचायत राज व्यवस्था स्विकारलेली आहे त्यामध्ये जिल्हा परीषद, पंचायत समिती आणि शेवटचे स्तर म्हणजे ग्रामपंचायत होय. वर्धा जिल्ह्यामध्ये 521 ग्रामपंचायती असून त्या स्तरावरील कारभार स्थानिक प्रशासनामार्फत चालतो. नागरीकांना विविध योजनेचा लाभ प्राप्त होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाची भुमिका महत्वाची आहे. ग्रामपंचायतमध्ये मेवा प्रकल्प माध्यमातून बी२सी, जी२सी, जी२जी महसुलचे संपुर्ण दाखले पंतप्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेचे रजिस्टेशन करणे, जीईएम रजिस्टेशन करणे, 15 वा वित्त आयोगाचे देयके काढणे, एम ॲक्शन सॉफ्ट रजिस्टेशन करणे, माहितीचा अधिकार, स्वामित्व योजना, राजश्री शाहू महाराज वृध्द कलावंत मानधन, माझी वंसुधरा, जन सुविधा व नागरी सुविधा, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (आरजीएसए), पंचायत विकास निर्देशांक, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, ग्रामपंचायत मार्फत 1 ते 7 दाखले द्वारे नागरीकांना आपल्या मोबाईलच्या अॅप मधून ऑनलाईन अर्ज करुन व फि भरुन तो दाखला ऑनलाईन प्राप्त करता येतो.
तसेच घरपट्टी, पाणीपट्टी स्व:तची करुन ती भरण्याची सुविधा करुन देण्यात आलेली आहे, नागरीकांना ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज भागत नाही. त्यामुळे नागरीकांची वेळेची बचत होऊन मानसिक त्रास कमी होण्यासाठी मदत झाली आहे. आजच्या डिजीटल युगामध्ये वर्धा जिल्ह्यातील 521 ग्रामपंचायतीने मागे न राहता नागरीकांना क्यूआर कोड द्वारे ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी तसेच इतर फि भरण्याची सुविधा करुन दिलेली आहे. सरकार सेवा केंद्र (एएसएसके) इ. हे वेळोवेळी केंद्रचालक व ग्रामसेवक यांना नविन येणाऱ्या प्रणालीचे प्रशिक्षण देवून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवितात तसेच वेळोवेळी ग्रामपंचायतींना भेटी देवून ग्रामसेवक व कर्मचारी यांचा आढावा सुध्दा घेतात व त्यांचा अडचणी सोडवितात.