बंद

    पशुसंवर्धन विभाग

    जिल्हया मध्ये पशुसंवर्धन विभागा कडुन शेतकरी पशुपालंका चेहिताच्या विविध योजना राबविण्यात येत असुन त्यामुळे त्यांचे जिवन मानात सकारात्मक बदल झालेला आहे.

    तसेच वर्धा जिल्हयातील शेतकरी पशुपालंकाचा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायाकडे वाढलेला कल लक्षात घेता हा व्यवसाय वृध्दीगंतहोत असल्याचे निर्दशनास येते.

    सर्वसाधारणमाहिती
    अ.क. क्षेत्रे आकडे
    1 जिल्हयाचे भौगोलीक क्षेत्र 6309 चौ.कि.मी.
    2 एकूण लोकसंख्या सन 2011 चे लोक संख्या नुसार 1231000
    3 त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या 906000
    4 जिल्हयातील एकूण पंचायत समिती 8
    5 जिल्हयातील एकूण गावे 1279
    6 जिल्हयातील एकूण ग्रामपंचायत 514
    7 फिरते पशुरोग नियंत्रण पथक 01
    8 पशुचिकित्सालय श्रेणी-1 22
    9 पशुचिकित्सालय श्रेणी-2 50
    10 आधारभूत ग्राम उपकेद्र 12
    11 विसाव्या पशुगणनेनुसार जिल्हयात एकूण पशुधन 489836

    दृष्टी:-

    सुधारित पशुसंवर्धन तंत्राद्वारे जिल्ह्यातील आर्थिक आणि पोषण विकास सुनिश्चित करणे.

    ध्येय:-

    जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात दूध, अंडी आणि मांस यांची मागणी आणि उपलब्धता यातील तफावत दूर करणे आणि त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करणे.

    खात्याचे उदिष्टे:-

    सुधारित पशुसंवर्धन तंत्राद्वारे जिल्ह्यातील आर्थिक आणि पोषण विकास सुनिश्चित करणे.

    पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत एकूण ८५ पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहेत. ज्यामध्ये २१ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, ६२ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ व १ फिरते पथक कार्यरत आहेत. विभागातील पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना नेमून दिलेले तांत्रिक कार्य लक्षांक हे पशुपालकांचा लाभ हेच अंतिम ध्येय आहे. पशुपालकाच्या सर्वांगीने विकासासाठी विभाग कार्यरत असून त्यादृष्टीने विभागाची वाटचाल सुरु आहे.

    1. आजारी जनावरांवर औषधोपचार
    2. प्रतिबंधात्मक लसीकरण
    3. आवश्यक लहान मोठया शस्त्रकिया
    4. कृत्रीम रेतनाद्वारे संकरित जनावरांची पशुपैदास
    5. बेरड वळू चे खच्चीकरण
    6. वांझ व गाभन जनावरांची तपासणी व त्यावर आवश्यक असलेला औषधोपचार
    7. शासन तसेच जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे पशुपालकांना लाभ होईल या हेतुने विहित योजनांची अंमलबजावणी व पशुपालकांना योग्य मार्गदर्शन करणे