बंद

    प्राथमिक शिक्षण विभाग

    वर्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इ. 1 ली ते 8 वी च्या मुलांना व मुलींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे प्रमुख असतात. इ. 1ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना वर्धा जिल्हापरिषद वर्धा मार्फत राबविल्या जातात.

    1. जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण.
    2. जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांच्या आस्थापना विषयक सर्व बाबी हाताळणे.
    3. दुर्बल घटकातील मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता देणे.
    4. प्राथमिक शाळांचे बांधकाम व दुरुस्ती.
    5. शौचालय बांधकाम.
    6. शौचालय दुरुस्ती.
    7. शाळा डीजीटल करणे.
    8. स्कॉलरशिप.

    जिल्हयात एकुण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा 908 आहेत, तर उच्च माध्यमिक शाळा 2 आहेत. या विभागाचा उददेश ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावणे व गुणवत्ता मध्ये वाढ करणे यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविल्या जाणा-या योजना उत्साहाने राबविल्या जातात.

    या विभागामार्फत शिक्षकांची भरती, बदली, समायोजन, पदोन्नती, कालबध्द पदोन्नती, आंतरजिल्हा बदली, आदर्श शिक्षक पुरस्कार, सेवानिवृत्ती प्रकरणे, रजा प्रकरणे, माहितीचा अधिकार इत्यादी प्रकारची कामे हाताळली जातात.