बंद

    कार्य विभाग

    जिल्हा परिषद मध्ये समाविष्ट असणा-या विविध विभागापैकी बांधकाम विभाग त्यापैकी एक विभाग आहे. बांधकाम विभागाचे मुख्य हे कार्यकारी अभियंता असून त्याचे अधिनस्त उपकार्यकारी अभियंता तसेच 5 उपविभाग त्यांचे देखरेखेखाली आहे. 5 उपविभागामध्ये उपविभागीय अभियंता असून त्याची कार्यालये तालुकास्तरावर आहेत.

    1. बांधकाम उपविभाग, वर्धा
    2. बांधकाम उपविभाग, देवळी
    3. बाधकाम उपविभाग, हिंगणघाट
    4. बांधकाम उपविभाग, आर्वी
    5. बांधकाम उपविभाग, कारंजा

    द्दष्टि व ध्येय:-

    पावसाळयाच्या दिवसामध्ये अतिवृष्टी/ पूरहानीमुळे ग्रामीण रस्ते तसेच इतर जिल्हा मार्गावरील डांबरी/खडीचे रस्ते तसेच पूल /मो-या/रपटे क्षतिग्रस्त होतात. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत चालण्याचे दृष्टीकोनातून रस्ते वाहतूकीयोग्य ठेवणे नितांत गरजेचे आहे. जिल्हयात ग्रामीण भागात मुलभूत सोई सुविधामध्ये इमारती व रस्ते यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गांव रस्त्याने जोडले असले पाहीजे तसेच दळणवळणसाठी ग्रामीण पायाभूत सुविधेसाठी बांधकाम विभागातील यंत्रणा कटीबध्द आहे.आणि चालू वर्षातील नियमित कामे वेळेच्या आत पूर्ण करणे व पुढील वर्षाचे नियोजन करुन ठेवणे, याकरीता आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करणे, व्ही.आर., ओ.डी.आर इत्यादी रस्ते व रस्त्यांची देखरेख व रस्ते सुयोग्य ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक गांव हे रस्त्यानी जोडले गेले पाहीजे आणि रस्ते वाहतुकीयोग्य ठेवणे हे मुख्य ध्येय (दृष्टी) आहे.

    कार्य:-

    बांधकाम विभगातील कामे:- बांधकाम विभागामध्ये विविध योजनेअंतर्गत कामे करण्यात येतात. त्यात खाली प्रकारच्या विविध कामे समाविष्ट करण्यात आलेले आहे.

    माहिती:-

    1. ग्रामीण मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण ३०५४-
    2. इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण ५०५४
    3. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचे बांधकाम व दुरुस्ती
    4. क वर्गीय तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
    5. पशुवैद्यकिय दवाखाना बांधकाम व दुरुस्ती
    6. प्राथमिक शाळा बांधकामे (वर्गखोली, शौचालय, संरक्षण भिंत) व दुरुस्त
    7. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती
    8. १५ वित्त आयोग अंतर्गत कामे
    9. आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम
    10. खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम
    11. आदीवासी रस्ते विकास माडा मिनीमाडा
    12. १७ सामुहिक विकास कार्यक्रम
    13. २५१५ मा. लोकप्रतिनिधींनी सुचवलिेली कामे

    वरील समाविष्ट असणारी कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे दृष्टीकोनातून बांधकाम विभागातील तांत्रीक विभागातील कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग सातत्याने प्रयत्नशिल असतात.

    खालील प्रकारची कामे बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात येतात.