जिल्हा परिषद मध्ये समाविष्ट असणा-या विविध विभागापैकी महिला व बालकल्याण विभाग त्यापैक एक विभाग आहे. बालकल्याण विभागाचे मुख्य हे जिल्हा कार्यक्रम अधिकारी असून त्याचे अधिनस्त 9 प्रकल्प त्यांचे देखरेखे खाली आहे. 9 प्रकल्पा मध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी असून त्याची कार्यालये तालुका स्तरावर आहेत.
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वर्धा-1
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वर्धा-2
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, देवळी
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सेलू
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ,हिंगणघाट
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प समुद्रपूर
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आर्वी
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी
- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कारंजा
ग्रामिण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे व त्यांचा आर्थीक दर्जा वाढविणे, त्यांचे जिवनमान उंचावणे ,त्याचप्रमाणे स्वच्छता,आरोग्य,कुटूंब याविषयी जाणीव जागृती निर्माण करणे. तसेच घटस्फोटीत परितक्या व इतर महिलांना दालन खुले व्हावे. याकरीता जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समिती मार्फत सदर योजनांची अमंलबजावणी करीत आहे.
- ग्रामिण भागातील स्त्रियांना 90% अनुदानावर साहित्य पुरविणे (शिलाई मशिन)
योजनेचा लाभ घेणेसाठी पात्रतेचे निकष :-
-
दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल. तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसिलदार यांचे जोडावे. सन 2024-
2025 चे वार्षीक उत्पन्न रु. 1,20,000/- (अक्षरी एक लाख विस हजार फक्त) पेक्षा जास्त नसावे. -
अर्जदार ही वर्धा जिल्हातील ग्रामिण भागातील रहिवासी असावी.(सरपंच / ग्रामसेवक / तलाठी यांचे प्रमाणपत्र जोडावे).
-
जातीचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी यांचे जोडावे.
-
सदर योजनेचा लाभ, लाभार्थीनी अन्य कोणत्याही विभागाकडून/ योजनेतुन घेतलेला नसावा.(लाभार्थीचे स्वंयघोषणापत्र जोडावे).
-
लाभार्थीना साहित्य शुल्काच्या 90% रक्कम अदा करणेत येईल. किवा या कार्यालयाकडून दर निश्चितीच्या 90 % रक्कम लाभार्थीना अदा करण्यात येईल.(यापेक्षा जे कमी असेल ती रक्कम).
-
लाभार्थीचे आधारकार्ड व बॅक पासबुकची झेरॅाक्स प्रत व बॅकेची सिडीग स्लीप अर्जासोबत जोडावी.
-
- ग्रामिण भागातिल 7 वी ते 12 वी पास मुलीना 100 % अनुदानावर (एमएस-सीआयटी) संगणक प्रशिक्षण देणे.
संगणकाचे ज्ञान,कौशल्य प्राप्त करण्यासाठी सदर योजना राबविण्यात येते. शासकीय /निमशासकीय नोकरी साठी एम.एस.सी.आय.टी. प्रशीक्षण अनिवार्य आहे. हा कार्यक्रम MKCL यांचेकडे असल्याने या महामंडळाचे अधीकृत प्रशीक्षण केंद्रात प्रशीक्षण आयोजित करावे.
योजनेचा लाभ घेणेसाठी पात्रतेचे निकष :-
- सदर संस्था MKCL मान्यताप्राप्त असणे अनिवार्य आहे.
- दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल.
- तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसिलदार यांचे जोडावे. सन 2023-2024 चे वार्षीक उत्पन्न रु. 1,20,000/- (अक्षरी एक लाख विस हजार फक्त) पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार ही वर्धा जिल्हातील ग्रामिण भागातील रहिवासी असावी.(सरपंच /ग्रामसेवक / तलाठी यांचे प्रमाणपत्र जोडावे).
- जातीचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी यांचे जोडावे.
- सदर योजनेचा लाभ, लाभार्थीनी अन्य कोणत्याही विभागाकडून/ योजनेतुन घेतलेला नसावा.(लाभार्थीचे स्वंयघोषणापत्र जोडावे).
- लाभार्थीचे आधारकार्ड अर्जासोबत जोडावे.
- ग्रामिण भागातिल वर्ग 5 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीना 100% अनुदानावर लेडीज सायकल पुरविणे.
-
दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल.अर्जदार ही वर्धा जिल्हातील ग्रामिण भागातील रहिवासी असावी.(सरपंच /ग्रामसेवक / तलाठी यांचे प्रमाणपत्र जोडावे).
-
जातीचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी यांचे जोडावे.
-
सदर योजनेचा लाभ, लाभार्थीनी अन्य कोणत्याही विभागाकडून/ योजनेतुन घेतलेला नसावा.(लाभार्थीचे स्वंयघोषणापत्र जोडावे).
-
विद्यार्थीनीचे निवास स्थान व शाळा यातील अतंर 1 किलोमिटरचे वर असावे. 2 किलोमिटर पेक्षा अधिक अंतर असल्यास प्राधान्य देण्यात येईल.(अंतराचे प्रमाणपत्र संबधित पंचायत समिती मधिल शाखा अभियंता यांचे जोडावे).
-
लाभार्थीचे आधारकार्ड व बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत व बॅकेची सिडीग स्लीप अर्जासोबत जोडावी.
-
- लेक लाडकी योजना
-
लेक लाडकी ही योजना पिवळया व केशरी पिवळया व केशरी शीधापत्रिकाधारक कुटूंबामध्ये दिनांक 1 एप्रिल,2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
-
पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता/पित्याने कुटूंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
-
तसेच दुस-या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
-
दिनांक 1 एप्रिल,2023 पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुस-या मुलीस किंवा जुळयामुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता/पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
-
लाभार्थीचे कुटुंब महाराष्टÅ राज्याचे रहीवाशी असणे आवश्यक राहील.
-
लाभार्थी बँक खाते महाराष्टÅ राज्यात असणे आवश्यक आहे.
-
लाभार्थी कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न रक्कम रु. 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे.
-