बंद

    लघु पाटबंधारे विभाग

    जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागाचे मुख्यालय असून वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वर्धा व हिंगणघाट येथे उपविभागीय कार्यालय आहे. आर्वी उपविभागा अंतर्गत आर्वी, आष्टी व कारंजा तालुका, वर्धा उपविभागाअंतर्गत वर्धा, देवळी व सेलू तालुका तसेच हिंगणघाट उपविभागा अंतर्गत हिंगणघाट व समुद्रपुर तालुका समाविष्ट आहे.

    या विभागा मार्फत ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गांव तलाव, साठवण तलावाची बांधकामे व त्यांचे व्यवस्थापन तसेच ० ते १०० हेक्टर सिंचन कोल्हापुर पध्दतीचे बंधारे, साठवण बंधारे,सिमेंट नालाबांध व उपसा सिंचन योजनेची बांधकामे व त्यांचे व्यवस्थापन ही कामे केल्या जातात.विभागाअंतर्गत तलाव मत्स्यव्यवसायाकरीता स्थानिक मच्छीमार व मच्छीमार संस्था यांना ठेक्याने दिल्या जातात.

    आस्थापना शाखा:-

    1. प्रत्येक महिन्यात 3 ते 4 तारखेला कर्मचारी दिन आयोजीत करुन प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे.
    2. कार्यालयातील सर्व पत्रव्यवहार ई-ऑफीस प्रणालीमार्फत प्रभावीपणे राबविणे.
    3. पदोन्नतीचे प्रस्ताव 100% वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
    4. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे लाभ मंजुर करणे.
    5. सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचे पात्र प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
    6. सेवापुस्तके अद्यावत करुन पडताळणी करीता सादर करणे.
    7. दुय्यम सेवापुस्तके अद्यावत करणे.

    विभागाअंतर्गत पुर्ण असलेल्या लघुपाटबंधारे योजना:-

    1. लघुसिंचन तलाव:- ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या २४ लघुसिंचनाच तलावाची कामे पुर्ण, त्यापासुन १९३८.१४ हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पीत आहे.

    2. पाझर तलाव:- पाझर तलावांची ४५ कामे पुर्ण करुन त्यापासुन २३२७. ८२ हेक्टर अप्रत्यक्ष सिंचन क्षमता निर्माण करणे. पाझर तलावांव्दारे प्रत्यक्ष सिंचन होत नाही. याव्दारे तलावाचे आजूबाजुच्या भागातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

    3. गाव/साठवण तलाव:- गांव तलावांची ४४ कामे पुर्ण साठवण तलावांची २३ कामे पुर्ण. यांचा उपयोग प्रत्यक्ष सिंचनासाठी होत नाही. परंतु भुस्तरातील पाण्याची पातळी वाढणे व गावातील गुरा-ढोरांना पाणी उपलब्ध होणे हा आहे.

    4. कोल्हापुर पध्दतीने बंधारे:- जिल्हयात १७५ कोल्हापुरी पध्दतीचा बंधा-याची कामे पुर्ण बंधाऱ्यापासुन 4311.31 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पीत सदर बंधाऱ्याचा उपयोग उपसा द्वारे सिंचन व जलसंधारणाकरीता होतो. सदर बंधारे सन 1988 ते 2000 या कालावधीत दगडाद्वारे बांधलेले आहेत. सदर बंधाऱ्यांची लांबी 30 ते 150 मी. पर्यंत आहे. पावसाळा संपल्यानंतर मान्सुनोत्तर प्रवाह बंधाऱ्यांत फळया टाकुन अडविल्या जातो. बंधाऱ्यात साधरणत: 25 ते 100 फळया टाकण्यात येतात. काही बंधाऱ्यावर शेतकऱ्यांना वही वाटी करीता पुल बांधलेले आहे.

    5. साठवण बंधारे :- साठवण बंधाऱ्यांची 279 कामे पुर्ण या बंधाऱ्यापासुन 2562.11 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पीत. सदर बंधाऱ्याचा उपयोग जलसंधारण व उपसा द्वारे सिंचना करीता होतो. सदर बंधारे सिंमेट काँक्रीट मध्ये बांधलेले असुन बंधाऱ्याची लांबी 10 ते 30 मीटर पर्यंत आहे. पावसाळा संपल्यानंतर मान्सुनोत्तर प्रवाह बंधाऱ्यात फळया टाकुन अडविल्या जातो. बधाऱ्यांत 2 ते 5 फळया असतात.

    6. सिमेंट नाला बांध :-सिमेंट नालाबांधची 1‍23 कामे पुर्ण ह्या पासुन 804.28 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पीत. यांचा उपयोग जलसंधारण व उपसाव्दारे सिंचनाकरीता होतो. सदर बंधारे सिमेंट – काँक्रीटमध्ये बांधलेले असून बंधाऱ्यंची लांबी 10 ते 30 मीटर पर्यंत आहे. सदर बंधाऱ्यास फळया नसतात.

    7. उपसा सिंचन योजना :- उपसा सिंचन योजनांची 5 कामे पुर्ण. त्यापासुन 298.50 हेक्टर सिंचन क्षमतानिर्मीत. सदर योजना सन 1965 ते 1980 या कालावधीत बांधण्यात आल्या. 4 योजना मोठ्या नदीवरील असून 1 योजना तलावावर आहे. लाभर्थी शेतकऱ्यांना विद्युत देयके न भरल्यामुळे सदर योजना देखभाली अभावि नादुरूस्त आहे. दुरूस्ती करणे शक्य नाही.

    8. विभागाची एकुण निर्मीती सिंचन क्षमता – वरील सर्व योजनांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचन क्षमता.

    जिल्हा वार्षीक योजना सन 2024-25 अंतर्गत प्रस्तावीत कामे:-

    1. लेखाशीर्ष 2702-6612 लघुपाटबंधारे तलावांची कामे व दुरूस्ती 0 ते 100 हेक्टर – सन 2024-25 मध्ये एकुण 11 तलावांची दुरूस्तांची कामे प्रस्तावीत करण्यात आली आहे त्यांची अंदाजपत्रकीय किमत रूपये 309.28 लक्ष आहे. त्यापैकी 8 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करून जिल्हा नीयोजन समीतीकडे प्रस्ताव निधी उपलब्धतेकरीता सादर करण्यात आले आहे.

    2. लेखाशीर्ष 2702-6621 लघुपाटबंधारे बंधाऱ्यांची कामे व दुरूस्ती 0 ते 100 हेक्टर :- सन 2024-25 मध्ये एकुण 31 बंधाऱ्यांच्या दुरूस्तांची कामे प्रस्तावीत करण्यात आली आहे त्यांची अंदाजपत्रकीय किमत रूपये 453.49 लक्ष आहे. त्यापैकी 25 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करून जिल्हा नीयोजन समीतीकडे प्रस्ताव निधी उपलब्धतेकरीता सादर करण्यात आले आहे.

    धडक सिंचन कार्यक्रम:-

    1. सिंचन विहिरीचे खोदकाम व बांधकाम करणे.
    2. भुसंपादन प्रस्ताव सादर करणे.
    3. जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेचे कार्यवृत्त तयार करणे व सादर करणे.

    उद्देश:-

    1. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे ‍शिवारातच अडविणे.
    2. भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.
    3. जिल्हयाच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे – शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
    4. अस्तीत्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोत्राची (बंधारे/ गाव तलाव /पाझरतलाव/ सिमेंट बंधारे) पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे.
    5. पाणी अडविणे/जिरविणे बाबत लोकांना प्रोत्साहन करणे/लोक सहभाग वाढविणे.
    6. अस्तीत्वातील जलस्त्रोतांमधील गाळ लोक सहभागातून काढुन जलस्त्रोतांचा पाणी साठा वाढविणे.

    उद्दिष्टे:-

    भारत देशामध्ये बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. ग्रामीण भागातील जनतेला शेतीकरीता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचन सुविधा मिळवुन देण्याकरीता लघुपाटबंधारे विभाग़ाची स्थापना करण्यात आलेली आहे.

    कार्य:-

    1. लघुपाटबंधारे विभागामार्फत विविध सिंचन योजनांची अंमलबजावणी करणे.
    2. जिल्ह्यातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याकरीता जलसंधारणाची कामे करणे.
    3. शासनाच्या जलसंवर्धन व स्रोत बळकटीकरणांचे उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे.