बंद

    लोकसेवा हक्क अधिनियम

    महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणा-या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला असून तो दि. २८-०४-२०१५ पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उ‍द्दीष्ट आहे.

    खालीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

    पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुध्द संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व व्दितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिका-यास प्रतिप्रकरण रु.५०००/- पर्यंत दंड होऊ शकतो.

     

    ग्राम विकास पंचायत राज विभागा मार्फत सेवा हमी कायदा अंतर्गत एकुण प्रकारचे दाखले ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेले आहेत

     सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
     जन्म नोंद दाखला ७ दिवस ग्रामपंचायत अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
     मृत्यू नोंद दाखला ७ दिवस ग्रामपंचायत अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
      विवाह नोंद दाखला ७ दिवस ग्रामपंचायत अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    दारिद्रय  रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस ग्रामपंचायत अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
     ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला ५ दिवस ग्रामपंचायत अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
     नमुना 8 चा उतारा ५ दिवस ग्रामपंचायत अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
     निराधार असल्याचा दाखला २० दिवस ग्रामपंचायत अधिकारी सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी

     

     

    महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट :- aaplesarkar.mahaonline.gov.in
    महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, नागपुर  विभागीय कार्यालय, नागपुर

    माहितीचा अधिकार

    पत्ता :- प्रशासकीय इमारत क्र.-०२ सिविल लाइन नागपूर-४४०००१

    दूरध्वनी –  ०७१२-२९९६६०५

    मेल आयडी : crtsnagpur[at]maharashtra[dot]gov[dot]in

    पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून सेवा प्राप्त न झाल्यास अथवा दिलेल्या मुदतीत न मिळाल्यास व प्रथम आणि द्वितीय अपिलात न्याय न मिळाल्यास कायद्याच्या १८(१) नुसार अर्जदार नमुना व्ही मध्ये द्वितीय अर्ज प्राप्त झाल्यापासून ६० दिवसात अपील दाखल करू शकतो.