पंचायत समिति समुद्रपूर
दि. १४.११. २०२५ रोजी शबरी आवास योजना सन २०२४-२५ अंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा पंस समुद्रपूर सभागृह येथे आयोजित करण्यात आला, यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना श्री. सतीश टिचकुले, ग.वि.अ. यांनी घरकुल बांधकाम विषयक मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे मनरेगा अंतर्गत मिळणारी रोजगार हमीची मजुरी कशा पद्धतीने विहित वेळेत काढावी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालयाबद्दल माहिती दिली.