बंद

    दृष्टी आणि ध्येय

    ग्रामीण पाणी आणि पुरवठा विभाग

    जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला घरगुती नळ जोडणींद्वारे शुध्द व स्वच्छ असे गुणवत्तापूर्ण पेयजलाचा नियमितपणे पाणी पुरवठा करुन त्यांचे आरोग्य सुस्थितीत राखणे व त्यांचे जीवनमान उंचावणे, पर्यायाने देशाच्या विकासात योगदान देणे हे या विभागाचे ध्येय आहे.

    पाणी आणि स्वच्छता विभाग

    उद्देश:-

    1. अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या ग्रामीण लोकसंख्येच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे.
    2. ग्रामीण भागातील आरोग्य मानके आणि जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करने.
    3. या अभियानाची अंमलबजावणी व यशस्वी साठी लोकसहभाग मिळविणे.
    4. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत माहिती शिक्षण संवाद व क्षमता बांधणी उपक्रम हा मुलभूत घटक असून लोकांच्या मानसिकतेमध्येय बदल घडवून आणून वैयक्तिक शौचालय व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामास चालना देणे.
    5. शौचालय बांधकाम व शौचालयाचा नियमित वापर करावा यासाठी गृहभेट व वर्तणूक बदल उपक्रमाव्दारे लोकांचे मनपरिवर्तन घडविणे.

    कार्य विभाग

    द्दष्टि व ध्येय:-

    पावसाळयाच्या दिवसामध्ये अतिवृष्टी/ पूरहानीमुळे ग्रामीण रस्ते तसेच इतर जिल्हा मार्गावरील डांबरी/खडीचे रस्ते तसेच पूल /मो-या/रपटे क्षतिग्रस्त होतात. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत चालण्याचे दृष्टीकोनातून रस्ते वाहतूकीयोग्य ठेवणे नितांत गरजेचे आहे. जिल्हयात ग्रामीण भागात मुलभूत सोई सुविधामध्ये इमारती व रस्ते यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गांव रस्त्याने जोडले असले पाहीजे तसेच दळणवळणसाठी ग्रामीण पायाभूत सुविधेसाठी बांधकाम विभागातील यंत्रणा कटीबध्द आहे.आणि चालू वर्षातील नियमित कामे वेळेच्या आत पूर्ण करणे व पुढील वर्षाचे नियोजन करुन ठेवणे, याकरीता आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करणे, व्ही.आर., ओ.डी.आर इत्यादी रस्ते व रस्त्यांची देखरेख व रस्ते सुयोग्य ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक गांव हे रस्त्यानी जोडले गेले पाहीजे आणि रस्ते वाहतुकीयोग्य ठेवणे हे मुख्य ध्येय (दृष्टी) आहे.

    लघु पाटबंधारे विभाग

    उद्देश:-

    1. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे ‍शिवारातच अडविणे.

    2. भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.

    3. जिल्हयाच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे – शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.

    4. अस्तीत्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोत्राची (बंधारे/ गाव तलाव /पाझरतलाव/ सिमेंट बंधारे) पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे.

    5. पाणी अडविणे/जिरविणे बाबत लोकांना प्रोत्साहन करणे/लोक सहभाग वाढविणे.

    6. अस्तीत्वातील जलस्त्रोतांमधील गाळ लोक सहभागातून काढुन जलस्त्रोतांचा पाणी साठा वाढविणे.

    समाज कल्याण विभाग

    आस्थापना शाखा

    1. प्रत्येक महिन्यात 3 ते 4 तारखेला कर्मचारी दिन आयोजीत करुन प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे.

    2. कार्यालयातील सर्व पत्रव्यवहार ई-ऑफीस प्रणालीमार्फत प्रभावीपणे राबविणे.

    3. पदोन्नतीचे प्रस्ताव 100% वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

    4. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे लाभ मंजुर करणे.

    5. सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचे पात्र प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

    6. सेवापुस्तके अद्यावत करुन पडताळणी करीता सादर करणे.

    7. दुय्यम सेवापुस्तके अद्यावत करणे.

    शिक्षण शाखा

    1. ज्या शाळांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या शाळांना गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत सुचना देवून तसेच प्रत्यक्ष मोबाईलवरुन संपर्क साधून अर्ज भरण्याकरीता कळविणे. व त्याबाबत पाठपुरावा करणे. ज्या शाळांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तांत्रिक सहाय्य विभागासोबत संपर्क साधून ऑनलाईन कार्यवाही पूर्ण करणे.

    2. शाळेंनी ऑनलाईन भरलेले अर्ज कार्यालयाचे आयडीवर पाठविण्याकरीता गटशिक्षणाधिकारी यांना कळविणे व त्याबाबत पाठपुरावा करणे.

    3. योजनानिहाय ऑनलाईन प्राप्त प्रस्ताव तपासून ऑनलाईन मंजूर करणे.

    4. अनुदानित वसतीगृहांचे 60% अग्रिम अनुदान प्रस्ताव निकाली काढणे.

    5. अनुदानित वसतीगृहांचे 40% अंतिम अनुदान प्रस्ताव निकाली काढणे.

    6. अनुदानित वसतीगृहांचे इमारत भाडे प्रस्ताव निकाली काढणे.

    7. अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे मानधन देयके निकाली काढणे.

    8. अनुदानित वसतीगृहातील मानधनावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली पदे भरण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबतची कार्यवाही करणे.

    9. अनुदानित वसतीगृहांची तपासणी करणे.

    अनुसूचित जाती उपयोजना शाखा

    1. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेतील तांत्रीक व प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांना निधी वितरण करणे.

    2. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेचा मासिक प्रगती अहवाल तयार करणे.

    3. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेच्या मंजूर कामांची तपासणी करणे.

    4. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेच्या अंतिम हप्त्यांच्या प्रस्तावाची मागणी करणे तसेच अंतिम हप्त्याच्या प्राप्त प्रस्तावाच्या कामाची मौका पाहणी करुन परिपुर्ण प्रस्तांवाना अंतिम हप्ताचा निधी देण्याबाबतची कार्यवाही करणे.

    5. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेच्या उर्वरीत कामांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करणे.

    6. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेतील वितरीत कामांचा गोषवारा व खर्चाचे ताळमेळ पंचायत समिती सोबत करणे.

    7. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेतील पुर्ण झालेल्या कामांना अंतिम हप्त्याचा निधी देणे प्राप्त निधी, वितरीत निधी, झालेला खर्च, मागील कामे, पुर्ण अपुर्ण कामाचा आढावा तसेच उर्वरीत निधी वितरीत करणे.

    नागरी हक्क संरक्षण शाखा

    1. आंतरजातीय विवाह योजनेच्या प्राप्त प्रस्तावांची तपासणी करुन प्राथमिक स्तरावर मंजूरी देणे, आवश्यक असल्यास नाहरकत प्रमाणपत्र मागविणे.

    2. आंतरजातीय विवाह योजनेच्या प्रलंबित तसेच नव्याने मंजूर प्रकरणांच्या खर्चासाठी आवश्यक तरतूदीचे विवरण तयार करणे.

    3. आंतरजातीय विवाह योजनेच्या प्राप्त सर्व प्रस्तावांना अंतिम मंजूरी देण्याची कार्यवाही करणे.

    प्राप्त तरतुदीनुसार प्रस्ताव निकाली काढून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरीत करणे.

    व्यसनमुक्ती शाखा

    1. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत मासिक सभेचे आयोजन करणे.
    2. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे.

    वृध्दाश्रम शाखा

    1. वृध्दाश्रमातील सोई सुविधांच्या अनुषंगाने नियमित तपासणी करणे.
    2. वृध्दाश्रमाचे परिपोषण अनुदान प्रस्ताव निकाली काढणे.

    जिल्हा परिषद सेसफंड योजना

    1. 20% जिल्हा परिषद सेसफंड वैयक्तीक लाभाच्या योजनेअंतर्गत साहित्य खरेदी केलेल्या लाभार्थांच्या खात्यात DBT व्दारे निधी जमा करण्याची कार्यवाही करणे.

    2. 20% जिल्हा परिषद सेसफंड सामुहिक लाभाच्या योजनेअंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या विकास कामांना प्रशासकिय मान्यता देणे.

    3. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सन 2024-25 चे अंतिम सुधारीत अंदाजपत्रक तयार करणे.

    4. 20% जिल्हा परिषद सेसफंड सामुहिक लाभ अंतर्गत विकास कामांचे व वैयक्तीक लाभ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे तपासणी करणे.

    5. 5% दिव्यांग निधी अंतर्गत दिव्यांगाकरीता राबविण्यात आलेल्या निर्वाह भत्ता योजनेच्या लाभार्थांच्या खात्यात निधी जमा करण्याची कार्यवाही करणे.

    दिव्यांग शाखा

    1. दिव्यांग शाळा/कार्यशाळेचे दरमहा वेतन नियमित कालावधीत कोषागार कार्यालयास सादर करणे.

    2. दिव्यांग शाळा कार्यशाळेचे अंतिम मुल्यनिर्धारण वेतनेत्तर परिपोषण माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये पुर्ण करुन प्राप्त झालेली तरतुद माहे मार्च पर्यंत वाटप करणे.

    3. दिव्यांग शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती प्रकरणे कार्यालयास प्राप्त झाल्यावर मा.महालेखाकार नागपुर यांजकडे सादर करणे.

    4. दिव्यांग शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएस खाते रक्कमेचा ताळमेळ करणे तसेच सेवानिवृत्ती कर्मचा-यांचे अंतिम भनिनि प्रस्ताव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वाक्षरीने अंतिम प्रदान करणेबाबत कार्यवाही करणे.

    5. आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

    6. दिव्यांगांच्या शाळा कार्यशाळा यांचे दरवर्षी माहे ऑक्टोबर मध्ये तपासणी करुन तपासणी अहवाल जानेवारी पर्यंत वरिष्ठ कार्याल्यास सादर करणे.

    7. दिव्यांगांच्या शाळा कार्यशाळा यांचे जुलै ऑगस्ट सप्टेबर चे बायोमट्रीक हजेरी तपासणी करुन पटनिर्धारण माहे ऑक्टोबंर मध्ये वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

    8. दिव्यांग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसन समिती मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील 3 महिन्यातुन बैठक आयोजित करणे.

    9. राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 समिती मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील 3 महिन्यातुन बैठक आयोजित करणे.

    10. दिव्यांगांचे केद्र शासनाच्या एडिप योजनेमधुन कॅम्प आयोजित करणे.

    11. दिव्यांग शाळा/कर्मशाळेतील न्यायाप्रविष्ठ प्रकरणे हाताळणे.

    12. दिव्यांग शाळा/कार्यशाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या आस्थापणा विषयक सर्व बाबी निकालात काढणे.

    13. दिव्यांग शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पंचायत समितीकडुन प्राप्त करुन त्यांची या कार्यालयाच्या स्तरावर तपासणी करणे.

    14. दिव्यांग शिष्यवृत्तीचे पात्र प्रस्ताव निकाली काढणे.

    15. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचे पात्र प्रस्ताव निकाली काढणे.

    16. दिव्यांग अव्यंग विवाह योजनेचे पात्र प्रस्ताव निकाली काढणे.

    पशुसंवर्धन विभाग

    दृष्टी:-

    सुधारित पशुसंवर्धन तंत्राद्वारे जिल्ह्यातील आर्थिक आणि पोषण विकास सुनिश्चित करणे.

    ध्येय:-

    जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात दूध, अंडी आणि मांस यांची मागणी आणि उपलब्धता यातील तफावत दूर करणे आणि त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करणे.