ग्राम पंचायत विभाग अंतर्गत विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
- राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (आरजीएसए) अंतर्गत सन 2022-23 ग्राम पंचायत बाजारवाडा ता. आर्वी यांना जल समृध्द गांव म्हणून पुरस्कार मिळाला.
-
ग्रामीण भागातील क वर्ग तिर्थक्षेत्र/यात्रास्थळांचा विकास करणे, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक:तिर्थवि-२०२१/प्र.क्र.651/योजना-7 दिनांक 16 नोव्हेंबर 2012 अन्वये ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्राच्या महात्म्यामुळे सदर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी दररोज सुमारे २०० ते ५०० भाविकांची आणि यात्रा/उत्सवाच्या वेळी दरवर्षी १ लाखापेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती असते. या उपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी शासनाने विहीत केलेल्या प्रमाणपत्रात भाविकांची उपस्थिती प्रमाणीत करुन दिल्यास अशी तिर्थक्षेत्रे क वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्याकरीता पात्र ठरु शकतात. सदर क वर्ग दर्जा मिळण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांनी शासन निर्णयातील नमुद १ ते ९ कागदापत्रासह प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती समोर सादर करण्यात येते.
- माझी वंसुधरा अभियान 4.0 अंतर्गत राज्यस्तरावर पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले आहे.
- पंचायत समिती सेलू ग्रा.पं. हिंगणी
- पंचायत समिती कारंजा ग्रा.पं. ठाणेगांव
- पंचायत समिती आर्वी ग्रा.पं. मिर्झापूर
- माझी वंसुधरा अभियान 4.0 अंतर्गत विभागीय स्तरावर पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले आहे
- पंचायत समिती देवळी ग्रां.पं. नाचणगांव
- पंचायत समिती वर्धा ग्रां.पं. आंजी (मोठी)
- पंचायत समिती सेलू ग्रा.पं. हिंगणी
- पंचायत समिती कारंजा ग्रा.पं. ठाणेगांव
- पंचायत समिती कारंजा ग्रा.पं. राजणी
- पंधरावा वित्त आयोग-
पंचायत राज संस्थाना अधिक सक्षम बनविण्यासाठी वित्त आयोगाचे नियोजन करण्यात आलेले आहे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘’आमचं गांव आमचा विकास‘’ या उपक्रमांतर्गत ‘’ग्रामपंचायत विकास आराखडा‘’तयार करुन त्यांची प्रभावी अंमलबजावणी वित्त आयोगाद्वारे केली जाते.पंचायती राज मंत्रालयाने सर्वकष अशा, ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना सन 2018 साली तयार केल्या. सन 2018 व 2019 मध्ये सर्वकष असे ग्राम विकास आराखडे (जीपीडीपी), ‘’सबकी योजना सबका विकास‘’ या नावाने तयार करण्यसाठी भारत सरकारच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने एकत्रितरीत्या ‘’लोक आराखडा मोहिम (पीपल्स प्लॅन कॅम्पेन – पीपीसी) जाहीर केली. अशा प्रकारच्या मोहिमेमुळे ग्राम विकास आराखड्यांची गुणवत्ता लक्षणियरीत्या सुधारली आहे.
पंधरावा वित्त आयोग अंतर्गत आर.आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात आली त्यातंर्गत सन 2020-21 मध्ये वर्धा तालुका अंतर्गत निवड करण्यात आलेल्या ग्राम पंचायत मदनी, ग्राम पंचायत रसुलाबाद सन 2021-22 मध्ये ग्राम पंचायत पेठ, ग्राम पंचायत कानकाठी व सन 2022-23 मध्ये निवड करण्यात आलेल्या ग्राम पंचायत मनसावळी या सर्व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी मा. पालकमंत्री जिल्हा वर्धा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
पुरस्कार तपशील
नाव: ग्रामपंचायत विभागांतर्गत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत.
वर्ष: 2023