शिक्षण विभाग (प्राथ.) जि.प. वर्धा. (दिपस्तंभ) जिल्हा
सन 2022-23 व 2023-24 मध्ये वर्धा जिल्हयामध्ये विदयार्थ्यांची शैक्षणिक संपादणूक वाढवण्याच्या उददेशाने व त्यांच्या अध्ययन क्षमतेत अधिक गतीने वाढ होण्यासाठी मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेतून व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनात “दिपस्तंभ” उपक्रम प्रभावीरीतीने राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्हयातील जि.प. व्यवस्थापनाच्या सर्व शाळांतील 100% शिक्षकांना ‘भविष्यवेधी शिक्षण प्रणाली’ चे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच दर महिन्याला शाळांतील सर्व (इ. 1 ते 8) विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी विषयांची अध्यनस्तर निश्चिती करणे व सदर नोंदी व्ही- स्कूल ॲप मध्ये करणे या बाबी समाविष्ठ करण्यात आल्या. प्रत्येक महिन्याच्या अध्ययनस्तर नोंदणी वरुन शिक्षकांनी अध्ययनस्तरात मागे असणा-या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळया प्रकारे मार्गदर्शन व उपचारात्मक अध्यापन तंत्राचा वापर करुन नाविण्यपूर्ण व भविष्यवेधी अध्ययन-अध्यापन प्रक्रीया राबविणे अंतर्भूत होते. सदर उपक्रमाचा आढावा जिल्हास्तरावरुन घेण्यात येत होता. सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचेव्दारे शाळाभेटी व मार्गदर्शन तसेच केंद्रस्तरीय व जिल्हास्तरीय शिक्षण परिषदांमध्ये शिक्षकांचे सादरीकरण व चर्चा या माध्यमातून ‘दिपस्तंभ’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हयामध्ये करण्यात आली. यामध्ये जि.प. शिक्षण विभाग (प्राथ.) व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून या उपक्रमाव्दारे जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या भाषा, गणित व इंग्रजी विषयातील संपादणूक पातळीत चांगली वाढ झाली. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहन घुगे यांना राष्ट्रीय स्तराचा ‘स्कॉच’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हीच या उपक्रमाची यशस्वीता आहे.
पुरस्कार तपशील
नाव: 'स्कॉच' पुरस्कार
वर्ष: 2023