केन्द्रपुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना रजिष्ट्रेशन ऑफ सोसायटी ॲक्ट 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अन्वये करण्यात आलेली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दारिद्रय रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याकरीता विविध योजना राबविल्या जातात त्यासाठी केन्द्र व राज्य शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेकरीता ग्रामविकास विभाग शासननिर्णय क्रमांक जिग्राप-1121/ प्र.क्र.43/ योजना-5 दिनांक 01 एप्रिल 2022 अन्वये नविन आकृतीबंध निर्माण करण्यात आलेला आहे.
प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा यांचे देखरेखीखाली 8 पंचायत समितीमध्ये त्यांची कार्यालये तालुकास्तरावर आहेत.
- पंचायत समिती वर्धा
- पंचायत समिती सेलू
- पंचायत समिती देवळी
- पंचायत समिती आर्वी
- पंचायत समिती आष्टी
- पंचायत समिती कारंजा
- पंचायत समिती समुद्रपुर
- पंचायत समिती हिंगणघाट