बंद

    शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. वर्धा योजनाविषयक माहिती

    • तारीख : 23/02/2025 -

    आरटीई 25 % योजना :- आरटीई 25 % योजना अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना इ. 1 ली/ नर्सरी (प्री केजी) वर्गात विना अनुदानित शाळांमध्ये 25 % राखीव जागेत प्रवेश दिला जातो. सदर प्रवेश प्रक्रीया ही ऑनलाइन स्वरुपात राबविल्या जाते.

    मोफत गणवेश योजना :- समग्र शिक्षा मोफत गणवेश ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विदयार्थ्याकरीता अनुज्ञेय असून प्रति गणवेश रु. 300 /- या प्रमाणे 2 गणवेश एका विदयार्थ्याला देण्यात येतात. शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 1 ली ते 8 वी तील विदयार्थ्याकरीता एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे अपलब्ध करुन देण्यात येते.

    मोफत पाठयपुस्तक योजना :- समग्र शिक्षा मोफत पाठयपुस्तक ही योजना शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासन अनुदानित शाळांमधील विदयार्थी, इ. 1 ली ते 8 वी च्या विदयार्थ्यांकरीता अनुज्ञेय आहे.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा