ध्वनी चित्र दालन
दि. ३१/१२/२०२५ रोजी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सोमण सर तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गोहाड सर यांनी लघु पाटबंधारे (जिल्हा परिषद) विभाग अंतर्गत येणाऱ्या आष्टी तालुक्यातील तळेगाव शा पंत येथील पाझर तलावाची पाहणी केली, सदर तलावावर अभिनव उपक्रमांतर्गत पर्यटन स्थळ विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यातील प्राथमिक टप्प्यातील कामांची पाहणी करून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर पाहणी दरम्यान जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर्वी, गट विकास अधिकारी आष्टी, जलसंधारण अधिकारी आर्वी उपस्थित होते